Home Breaking News दणका…हजारो टन कोळशाची वाहतुक रोखली

दणका…हजारो टन कोळशाची वाहतुक रोखली

● शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ● महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

1194
C1 20231207 17232365

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

MNS NEWS WANI : वेकोली निर्मीत समस्‍येंचा डोंगर परिसरात उभा ठाकला आहे. वाढलेल्‍या प्रदुषणाने सर्वसामान्‍य नागरिकांसह शेतपिके धोक्‍यात आली आहे. कवडीचाही मोबदला शेतकऱ्यांना दिल्‍या जात नसल्‍याने महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे नेते राजु उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली रस्‍तारोको करुन हजारो टन कोळशाची वाहतुक रोखण्‍यात आल्‍याने वेकोली प्रशासनात प्रचंड तारांबळ उडाली आहे. The transportation of thousands of tonnes of coal has been stopped, causing a huge uproar in the wcl administration.

परिसरातील कोळसा खदानी पैकी मुबलक उत्‍खनन असलेल्या पैनगंगा, कोलगाव आणि मुंगोली येथील खदानीतून दिवसाकाठी कोळशाची हजारों टन वाहतूक होत आहे. तर कोळसा वाहतूक करणारे वाहने नियमबाह्य पद्धतीने चालत आहे, अनेक वाहनांची कालबाह्यता झालेली आहे. वहन क्षमतेपेक्षा जास्‍त प्रमाणात होणारी वाहतुक यामुळे नव्‍यानेच बांधण्‍यात आलेल्‍या रस्‍त्‍याचे ‘बारा’ वाजले आहेत.

दररोज शेकडो  अवजड वाहनांच्‍या माध्‍यमातुन होत असलेली कोळसा वाहतुक आणि रस्‍त्‍यावर पडणारा कोळसा यामुळे मोठया प्रमाणात धुलीकण प्रदुषण होताहेत. यामुळे रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेल्‍या शेतातील शेतपिके पुर्णतः नष्‍ट झालेली आहे. उत्‍पादन क्षमता घटल्‍याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. सर्वाधीक बाधीत शेतकरी येनक, येनाडी,  शिवणी,  कोलगाव, शेवाळा, शिंदोला, शिरपुर व चारगांव परिसरातील आहेत.

कोळसा वाहतुकीतून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्‍यांना घेऊन परिसरातील नागरीक आणि शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व त्याचबरोबर वेकोलीच्या क्षेत्रिय महाप्रबंधकांशी वारंवार पत्र व्यवहार करून विविध मागण्या लावून धरल्या होत्या. माञ कुंभकर्णी झोपेत असलेले वेकोली व महसुल प्रशासन कोणताही मोबदला देण्‍यास उत्‍सूक नाहीत. यामुळेच मनसेला तिव्र आंदोलन छेडावे लागत आहे.

मनसेचे नेते राजु उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात येनाडी – येणक फाट्यावर रास्तारोको करण्‍यात आला. यावेळी कोळशाची शेकडो वाहने रोखुन धरण्‍यात आली. माञ शेतकरी हितांचा निर्णय घेण्‍यासाठी वेकोली प्रशासन अद्याप सरसावले नाही. यामुळे आंदोलन आक्रमकतेकडे वळते की काय अशी शक्‍यता निर्माण झाली आहे.

या आंदोलनात नुकसानग्रस्त शेतकरी प्रमोद दातारकर, विट्ठल पानघाटे, मारोती मिलमिले, नरेश गोखरे, पांडुरंग मिलमिले,  सुभाष वासाडे, गोपाळ मत्ते, पुंडलिक पंडीले, पुंडलिक बांदुरकर, रमेश देवळकर यांच्या सह मनसेचे रणजित बोंडे, धीरज पिदुरकर, साई ऊगे, गजानन ठाकरे, गजानन बुच्चे, प्रवीण मोहजे, सूरज पिदुरकर, सूरज काकडे, गौरव बोबडे, सूरज दातारकर, धीरज बगवा सहभागी झाले आहे.
Rokhthok News