Home Breaking News खाजगी चालकाची गळफास लावून आत्महत्या

खाजगी चालकाची गळफास लावून आत्महत्या

630
C1 20240404 14205351

वणी :- शहरातील देशमुखवाडी परिसरात वास्तव्यास असलेला खाजगी वाहन चालकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

मनोज चकोर वय 35 असे मृतकाचे नाव आहे. तो खाजगी चालक म्हणून काम करीत होता. दि 9 फेब्रुवारी ला दुपारी आपल्या राहते घरी त्याने ओढणी च्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

त्याने टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती कळू शकली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास करीत आहे.मृतक मनोज च्या मागे आई,पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

वणी : बातमीदार