Home क्राईम कोंबडबाजारावर धाड, तिघे जुगारी ताब्यात

कोंबडबाजारावर धाड, तिघे जुगारी ताब्यात

● दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

2401
C1 20240404 14205351

दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Crime News | भालर मार्गावरील एक बिअर बारच्या मागे जंगलात कोंबड्याच्या झुंजी लावून हरजित केल्या जात होती. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोलिसांनी धाड सत्र अवलंबले असता तिघांना ताब्यात घेत, एक लाख 49 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. When the police resorted to raids, the three were detained and valuables worth Rs 1 lakh 49 thousand 800 were seized.

बंडू नामदेव झाडे (48), शंकर केशव कोटनाके (30) व राम पंढरी चहारे (48) असे ताब्यातील कोंबड्याच्या झुंजी लावून हरजीत करणाऱ्या जुगाऱ्यांची नावे आहेत. ठाणेदार अजित जाधव यांना कोंबड बाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

पोलीस स्टेशन हद्दीत कोणतेही अवैद्य धंदे फोफावणार नाहीत याची खबरदारी घेण्याची सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली आहे. याकरिता गोपनीय महितगारांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परिसरात अवैद्य व्यावसायिक डोके वर काढत असेल तर कठोर कारवाई पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित आहे.

रविवारी दुपारी पोलीस पथकाने कोंबड बाजार सुरू असलेल्या ठिकाणी धाड सत्र अवलंबले. यावेळी कोंबड्याच्या झुंजी लावून हरजीत सुरू होती. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत दोन कोंबडे, 4 हजार 200 रुपये रोख व चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, API दत्ता पेंडकर व पोलीस पथकांनी केली.
Rokhthok News