Home Breaking News थोडक्यात बचावले, कारची दोन्ही चाके रस्त्याच्या खाली

थोडक्यात बचावले, कारची दोन्ही चाके रस्त्याच्या खाली

● रस्त्याचे अर्धवट बांधकाम घातक

2634

रस्त्याचे अर्धवट बांधकाम घातक

Wani news | अर्धवट बांधकाम करण्यात आलेल्या मार्गावर शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान एकता नगर जवळ अपघाती घटना घडली. सिमेंट रस्त्यावरून टिळक चौकाकडे येणाऱ्या कार क्रमांक MH-34- AM-3422 ची दोन्ही चाके अक्षरशः रस्त्याच्या कडेला खाली उतरली. कार पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता, मात्र प्रवाशी थोडक्यात बचावले. An accident took place near Ekta Nagar between 8:30 pm on Friday night on a partially constructed road.

शहरात वरोरा मार्गावर बांधण्यात आलेला सिमेंटकॉक्रीटचा रस्‍ता अर्धवट स्वरूपात आहे. एकाबाजूने बांधकाम करून कामच ठप्प पडले आहे. यामुळे हा मार्ग अपघाताला निमंत्रण देत आहे. अंदाजे 22 कोटी रुपये खर्च करुन सिमेंट कॉक्रीटचा रस्‍ता बांधण्‍यात येत असून मागील तीन महिन्यापासून काम बंद पडले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या माध्‍यमातुन शहरात सिमेंट कॉक्रटचा रस्‍ता निर्माणाधीन आहे. काही प्रमाणात रस्‍त्‍याचे काम झाले आहे माञ वर्क ऑर्डर प्रमाणे काम करण्‍यात आले नाही. भ्रष्‍ट्राचाराचे कुरण ठरलेल्‍या या रस्‍ता बांधकामामुळे विविध अडचणी निर्माण झाल्‍या आहेत. अर्धवट नियमबाहय पध्‍दतीने बांधण्‍यात आलेल्‍या रस्‍त्‍यामुळे मोठया अपघाताची शक्‍यता बळावली असून त्याचा प्रत्यय सुद्धा येत आहे.

टिळक चौकापासून बाजार समिती पर्यंत एक बाजूने सिमेंट कॉक्रटचा रस्‍ता बांधला आहे यामुळे तो भाग उंच तर दुसरी बाजू सखल आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. तात्पुरते डिव्हायडर लावल्यास वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येणार आहे. अन्यथा मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
Rokhthok News

Previous articleManse Dahihandi : 41 फुटांचा थरार…वणीत
Next articleCrime…सात जुगारी पोलिसांच्या ताब्यात
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.