Home Breaking News एक लाख रुपये किमतीची 410 लिटर दारू नष्ट

एक लाख रुपये किमतीची 410 लिटर दारू नष्ट

605
C1 20240404 14205351

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

रोखठोक | एक वर्षांपासून राज्य उत्पादन विभागाने अनेक अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाया केल्यात. त्या 45 गुन्ह्यात जप्त केलेली एक लाख रुपये किमतीची 410 लिटर देशी विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दारू विक्रीचा अवैध व्यवसाय लपून छपून केल्या जातो. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाया केल्या होत्या.

वणी परिसरातील अवैद्य दारू व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आलेली देशी- विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामात ठेवण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने जप्त केलेली दारू नष्ट करण्याचे आदेश पारित केले.

न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्याधिकारी अमोल येडगे यांनी जप्त करण्यात आलेली दारू नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून बुधवार दि. 9 नोव्हेंबर ला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एम के सुर्वे दुय्यम निरीक्षक यांनी दारू नष्ट केली आहे.
वणी : बातमीदार