Home वणी परिसर वर्धा नदीवरील पुल वाहून गेल्‍याने कोळशाचे वितरण ठप्प

वर्धा नदीवरील पुल वाहून गेल्‍याने कोळशाचे वितरण ठप्प

● वेकोलीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान ● अवजड वाहनांची वाहतुक शिंदोला-चारगांव मार्गाने

1433
C1 20240404 14205351

वेकोलीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान
 वाहनांची वाहतुक शिंदोला-चारगांव मार्गाने

Wcl news wani | मुंगोलीतील वर्धा नदीवरील दोन्ही पूल खराब झाल्यामुळे वेकोलीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तात्‍पुरता बांधलेला पुल सुध्‍दा वाहुन गेल्‍यामुळे दररोज तब्बल 22 हजार टन कोळशाचे वितरण ठप्प झाले आहे. तर नव्‍यानेच बांधण्‍यात आलेल्‍या शिंदोला ते चारगांव या मार्गावरुन सध्‍यस्थितीत होणारी अवजड वाहनांची वाहतुक रस्‍त्‍याच्‍या दुर्दशेला कारणीभूत ठरणार आहे. Wcl is suffering a loss of crores of rupees due to the damage of both the bridges on the Wardha river in Mungoli.

वणी परिसरात 29 वर्षापुर्वी मुंगोली येथे कोळसा खाण सुरू झाली. या खाणीतून निघणारा हजारो टन कोळसा वाहून नेण्यासाठी वर्धा नदीवर 500 मीटरपेक्षा जास्त लांबीचा 9 खांब असलेला पूल बांधण्यात आला होता. यावर्षी कोसळलेल्‍या मुसळधार पावसामुळे अवघ्या  2  महिन्यांत चार वेळा या पुलावरून पाणी वाहून गेले.

c1_20230510_19560693

पुराच्या पाण्यामुळे पुलाच्या 9 खांबांपैकी 5 क्रमांकाचा खांब एका बाजूला झुकला. यामुळे संबंधित विभागाच्या आदेशानुसार पुलावरून अवजड वाहनांसह दुचाकी व पादचाऱ्यांची वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे यवतमाळ व चंद्रपुर जिल्‍हयाला जोडणारा व परिसरातील तब्‍बल 20 गावातील विद्यार्थी,  नागरिक,  रुग्‍ण व कामकाजानिमीत्‍य चंद्रपुरला जाणाऱ्यांची गोची झाली.

वेकोली प्रशासनाने पाच महिन्‍यापुर्वी 18 लाख रुपये खर्च करुन वर्धा नदीवर पाईप टाकून तात्पुरता कल्व्हर्ट बांधण्यात आला होता. चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारा मुंगोली ते घुग्‍गूस येथील वर्धा नदीवर बांधण्‍यात आलेला तात्‍पुरता पुल धरणातुन अचानक सोडण्‍यात आलेल्‍या विसर्गामुळे  3 मे रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पाईपसह वाहून गेला.

वर्धा नदीवरील दोन जिल्ह्यांना जोडणारे दोन्ही पूलबंद झाल्यामुळे नागरिक व वेकोली कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तर गेल्या सहा दिवसांपासून वेकोली वणी परिसरातील मुंगोली, पैनगंगा, कोलगाव आदी खाणीतून दररोज होणारी लाखो टन कोळशाची वाहतूक ठप्प झाली आहे.

कोळसा व्यावसायिकांनी काही प्रमाणात अवजड वाहनांची वाहतुक शिंदोला, चारगांव ते घुग्‍गूस अशी वळविण्‍यात आली आहे. यामुळे 20 टन वहन क्षमता असलेल्या मार्गावरून 50 टन वजनाचे अवजड वाहन धावत असल्याने स्‍थानिक पुढारी विरोध करत आहे. तर अवजड वाहनाला मनाई करावी अशी भूमिका घेत आहे. आता वेकोली प्रशासन व बांधकाम विभाग पुढे कोणती भुमीका घेणार हे बघणे औत्‍सूक्‍याचे ठरणार आहे.
वणी: बातमीदार