Home Breaking News नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास

नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास

639
Img 20240613 Wa0015

लाठी (बेसा) येथील घटना

रोखठोक | तालुक्यातील लाठी (बेसा) येथे वास्तव्यास असलेल्या 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. उशिरा रात्री घडलेली घटना शनिवार दि. 10 डिसेंबर ला उघडकीस आली.

राजेंद्र सुधाकर हजारे (29) असे मृतकाचे नाव आहे. तो लाठी (बेसा) येथील निवासी होता. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याचे घरच्या मंडळी सोबत सातत्याने वाद व्हायचे. यामुळे त्याने नैराश्यातून आत्मघात केल्याचे बोलल्या जात आहे.

शुक्रवारी रात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यावर त्याने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब शनिवारी सकाळी घरच्यांना समजली. त्याच्या वडिलांने तात्काळ शिरपूर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करताहेत.
वणी : बातमीदार

C1 20240529 15445424