Home Breaking News बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा द्या…! खा. धानोरकरांची संसदेत मागणी

बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा द्या…! खा. धानोरकरांची संसदेत मागणी

448

‘लकिशा बंजारा’ यांचा पुतळा संसद भवन परिसरात उभारा

वणी- तुषार अतकारे : संसद भवन ज्या जागेवर उभे आहे ती जागा बंजारा समाजाचे ‘लकीशा बंजारा’ यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. याकडे सभागृहाचे लक्ष वेधत बंजारा समाजाची या भूमीशी भावनात्मक जवळीक लक्षात घेता.. संसद भवन परिसरात त्यांचा पुतळा उभारावा तसेच बंजारा भाषेला संविधानातील 8 व्या सूची मध्ये समाविष्ट करून राष्ट्रीय दर्जा द्यावा अशी मागणी खा. बाळू धानोरकरांनी संसदेत केली.

संपूर्ण देशात बंजारा समाज पुरातन काळापासून घरदार सोडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे. ठिकठिकाणी एस.टी, एस.सी, ओबीसी, व्ही. जे. एन. टी या प्रवर्गात विखुरला आहे. लोकगीते व लोकनृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या समाजाची बोली भाषा मात्र सर्वत्रच एक आहे.

बंजारा समाज शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या फार मागे आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एक विशेष वर्गात समाविष्ट करून सर्वागीण विकासाच्या मार्ग मोकळा करावा. बंजारा भाषेला ( जी भाषा संपूर्ण भारतात बोलल्या जाते) तिला राष्ट्रीय दर्जा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे संविधानातील 8 व्या सूची मध्ये समाविष्ट करून या बंजारा भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्यस्थीतीत संसद भवन ज्या जागेवर उभे आहे, ती जागा बंजारा समाजाचे ‘लकीशा बंजारा’ यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. याकडे सभागृहाचे लक्ष वेधत त्यांचा पुतळा संसद भवन परिसरात उभारावा अशी आग्रही मागणी चंद्रपूर- आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खा. बाळू धानोरकरांनी संसदेतील शुन्य प्रहरात बोलतांना केली आहे. केंद्र सरकार या महत्वपूर्ण मागणी कडे किती गांभीर्याने लक्ष देणार याकडे बंजारा समाजाचे लक्ष लागले आहे.
वणी : बातमीदार