Home Breaking News वणीत नॅचरल थेरेपी चिकित्‍सा शिबिर

वणीत नॅचरल थेरेपी चिकित्‍सा शिबिर

● आयोजक ऍड. कुणाल चोरडिया

610

आयोजक ऍड. कुणाल चोरडिया

Wani News | निरोगी काया कोणाला नकोय,  याकरीता विविध प्रकारच्‍या पध्‍दती प्राचिन काळापासुन अवलंबल्‍या जातात. एक्‍युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अँड ट्रिटमेंट संस्‍थान जोधपुर राजस्‍थान व जय श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने एक्‍युप्रेशर, सुजोक,  वाईब्रेशन नॅचरल थेरेपी चिकित्‍सा शिबिराचे आयोजन दिनांक 11 ते 16 सप्‍टेंबर पर्यत श्री विनायक मंगल कार्यालय येथे करण्‍यात आले आहे. या शिबिराचे आयोजक ऍड. कुणाल चोरडीया हे आहेत. The camp has been organized at Shri Vinayak Mangal karyalay. Organizer of this camp Adv. Kunal Chordia.

आयोजीत शिबिर सकाळी 9 ते 1 वाजता व सायंकाळी 4 ते 8 वाजता पर्यंत असणार आहे. शिबिरात एक्‍युप्रेशर सहा दिवसांचे असुन केवळ 100 रुपये नोंदणी शुल्‍क भरावे लागणार असुन अन्‍य उपचार निशुल्‍क असणार आहे. शिबिरात तज्ञ थेरपिष्‍ट गोरधन चौधरी व आर. पी. सिंह हे असतील.

आयोजीत शिबिरात विना औषधांचे अनेक रोगांवर उपचार करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने डोकेदुखी, डोळे,  कान, नाक, दमा, गळयाचे रोग,  लठठपणा, कब्‍ज गॅस, गुडघेदुखी, साईटिका 3,  सर्बाईकल आजार, मानेचा रोग, कंबरदुखी, सांधेदुखी,  लकवा, संधीवात, ब्‍लड प्रेशर, मधुमेह, थायराईड,  मुतखडा, बवासिर, मानसिक तनाव, झोप न येणे, उंची वाढवणे आदि आजारावर उपचार करण्‍यात येणार आहे तसेच प्रत्‍येक रुग्‍णांवर दररोज 15 ते 20 मिनिटे इलाज करण्‍यात येणार आहे.
Rokhthok News