Home Breaking News त्या…बेदम मारहाण झालेल्या वृद्धाचा अखेर ‘मृत्यू’

त्या…बेदम मारहाण झालेल्या वृद्धाचा अखेर ‘मृत्यू’

973

हत्‍येचा गुन्‍हा नोंद होणार…

तालुक्‍यातील भालर येथे गुरुवार दि. 7 ऑक्‍टोबर ला एका तरुणाने वचपा काढण्‍याकरीता बैलबंडीच्‍या उभारीने बेदम मारहाण केली होती. जखमी वृद्धाला चंद्रपुर येथील रूग्‍णालयात उपचारार्थ दाखल करण्‍यात आले होते. सोमवार दि. 11 ऑक्‍टोबरला दुपारी त्‍या वृद्धाचा मृत्यू झाला असुन आरोपींवरील गुन्‍हयात वाढ करण्‍यात आली आहे.

आशिष मधूकर वरारकर (35) असे आरोपींचे नांव आहे तो भालर येथील निवासी आहे. घटनेच्‍या दिवशी आरोपीला मदयधुंद अवस्‍थेत त्‍याच्‍या मिञांनी सायंकाळी घरी सोडले होते. मद्य प्राशन केल्‍याची बाब घरच्‍यांना माहित झाल्‍यामुळे आशिष ला प्रचंड राग आला,

कालांतराने सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्‍यान आशिष हा मिञ प्रतिकच्‍या घराजवळ पोहचला. यावेळी प्रतिक चे आजोबा नामदेव घुलाराम बांदूरकर हे घराबाहेर उभे होते. त्‍यांनी सहजच “तु येथे कशाला आला” असे विचारले असता त्‍यांचा राग अनावर झाला आणि तडक बैलबंडीच्‍या उभारीने त्‍या वृद्धावर हल्‍ला चढवला.

आरोपी आशिष याने वृद्धाला बेदम मारहाण केली यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्‍यांना तातडीने चंद्रपुर ला उपचारार्थ हलविण्‍यात आले. आणि वृद्धाचा नातू प्रतिक याने थेट वणी पोलीस स्‍टेशन गाठत रितसर तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी आरोपी आशिष मधुकर वरारकर (35) याच्याविरोधात भादंविच्या कलम 324 व 504 नुसार गुन्हा दाखल केला होता. याच घटनेतील वृद्धाचा मत्‍यू झाल्‍यामुळे आता हत्‍येचा गुन्‍हा नोंद करण्‍यात येणार असुन ठाणेदार शाम सोनटक्‍के यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक प्रवीण हिरे, प्रकाश बोरलेवार पुढील तपास करीत आहे.

वणी: बातमीदार