Home Breaking News ट्रकवर दुचाकी आदळली, तरुण ठार

ट्रकवर दुचाकी आदळली, तरुण ठार

● पुरड परिसरात घडली घटना

3564
C1 20231211 14540968

पुरड परिसरात घडली घटना

Accident News Wani : कोळसा वाहतुक करणारी व रस्‍त्‍यावर उभी असणारी अवजड वाहने दिवसेंदिवस कर्दनकाळ ठरतांना दिसत आहे. पुरड शिवारात रस्‍त्‍यावर उभ्‍या असलेल्‍या ट्रकवर दुचाकी आदळली. यात 32 वर्षीय तरुणांचा हकनाक बळी गेल्‍याची घटना रविवारी राञी साडे अकरा वाजताच्‍या दरम्‍यान घडली. 32-year-old youth’s death took place on Sunday around 11:30 pm.

विजय श्रवण साहु (32) असे दुर्देवी मृतकांचे नांव आहे, तो अमराई वार्ड घुग्‍गूस येथील निवासी होता. घटनेच्‍या दिवशी वणी येथील काम आटोपुन आपल्‍या दुचाकी क्रमांक MH-34-BC- 5144 या प्लसरने तो गावी परतत असतांना पुरड जवळ रस्‍त्‍यावर उभ्‍या असलेल्‍या ट्रक क्रमांक MH-34-AB- 6710 वर दुचाकी आदळली.

घडलेल्‍या घटनेत त्‍याला जबर मार लागला, प्रचंड रक्‍तस्‍ञाव झाल्‍याने त्‍याचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला. या अपघात प्रकरणी स्‍थानिक नागरीकांनी शिरपुर पोलीसांना सुचित केले. पोलीसांनी घटनास्‍थळ गाठून पंचनामा केला असुन ट्रक चालकांवर गुन्‍हा नोंद केला आहे.                    ROKHTHOK NEWS