
● विविध कार्यक्रमाचे आयोजन
रोखठोक | वणीत श्रीराम जन्मोत्सव ऐतिहासीक व भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचा संकल्प श्रीराम नवमी उत्सव समितीने केला आहे. भव्य शोभायाञा, रामरथ, अश्वमेघ, देखावे, पारंपारिक वाद्य आणि फटाक्यांची आतिषबाजी प्रमुख आकर्षण असणार आहे. संपुर्ण शहर भगव्या पताकांनी सजणार असुन प्रमुख मार्गावर रांगोळी साकारण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने दि. 30 मार्चला अभुतपूर्व शोभायाञेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध देखावे, पारंपारीक वाद्य आणि फटाक्याची आतिषबाजी प्रमुख आकर्षण असणार आहे. श्रीराम मंदिरातुन शोभायाञेला सुरुवात होणार असुन शहरातील प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण करत मंदिरातच शोभायाञेची सांगता होणार आहे.
शहरात मागील 58 वर्षापासुन अविरतपणे निघणारी शोभायाञा कालानुरूप विस्तृत होत चालली आहे. यावेळी भजन कीर्तन करून श्रीरामाची पालखी, रामरथ, अश्वमेघ आणि देखावे साकारण्यात येणार आहे. शहरात आणि ग्रामीण भागांत हिंदुप्रेमींनी आपापल्या घरावर भगवे झेंडे लावावेत तसेच शोभायाञा मार्गक्रमण करत असलेल्या मार्गावर माता भगीनींनी उत्स्फूर्तपणे रांगोळया काढावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने शहरातील तमाम नागरिकांनी तसेच हिंदुप्रेमी जनता व हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी शोभायाञेत प्रामुख्याने सहभाग नोंदवावा असे आवहन समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे.
वणी: बातमीदार