Home Breaking News रान डुक्करचा हल्ला, युवक गंभीर जखमी

रान डुक्करचा हल्ला, युवक गंभीर जखमी

1005

डोल डोंगरगाव येथील घटना

वणी: रानटी जनावरांचा मुक्तसंचार उपविभागात सुरू आहे. मारेगाव तालुक्यातील डोलडोंगरगाव (पारधीबेडा) येथील 24 वर्षीय तरुण पहाटे लगतच असलेल्या शेतात शौचास गेलेला असताना त्याचेवर रान डुक्कराने हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाला आहे.

वासुदेव सदाशिव भोसले (24) हा डोल डोंगरगाव (पारधीबेडा) येथील निवासी आहे. रविवार दि.12 जूनला सकाळी तो प्रातःविधि साठी गावाजवळील एका शेतात गेला होता. याचवेळी मागून आलेल्या रान डुक्कराने त्याचेवर जबर हल्ला चढवला.

या घटनेत तो तरुण गंभीर जखमी झाला. हल्ला होताच त्याने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार