Home Breaking News Congress party : जनसंवाद यात्रा… अभूतपूर्व

Congress party : जनसंवाद यात्रा… अभूतपूर्व

● भव्य बाईक रॅली आणि आज समारोप

647

भव्य बाईक रॅली आणि आज समारोप

https://youtu.be/TRwk5tpgLrI?si=0NwhMJJF33sPgodw

Wani News : काँग्रेस पक्षाच्या वतीने झरी, मारेगाव आणि वणी या तिन्ही तालुक्यात झंझावाती जनसंवाद यात्रा पार पडली. यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दिनांक 12 सप्टेंबर ला दुपारी दोन वाजता भव्य बाईक रॅली वणी शहरातून निघणार असून सायंकाळी 4 वाजता शेतकरी मंदिरात समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. On behalf of the Congress party, Jansamvad Yatra was held in three talukas namely Zari, Maregaon and Wani.

भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वणी विधानसभा क्षेत्रात दिनांक 4 सप्टेंबर रोजी झरी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. झरी, मारेगाव आणि वणी अशा तिन्ही तालुक्यात अविस्मरणीय, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, पीकविमा, शेतक-यांचे विविध प्रश्न, धार्मिक सलोखा तसेच स्थानिक मुद्दयांबाबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. 4 सप्टेंबरला झरी तालुक्यातून या जनसंवाद यात्रेला सुरूवात झाली. आशिष खुलसंगे व राजीव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद साधण्यात आला.

जनसंवाद यात्रा मारेगाव तालुक्यात दिनांक 6 सप्टेंबर ला पोहचली. मार्डी आणि वेगाव या दोन सर्कलमधले अधिकाधिक गावांचा दौरा केला. नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, मारोती गोहोकर, गौरीशंकर खुराणा, अंकुश माफूर इत्यादींची प्रमुख उपस्थितीत ही यात्रा झालाी. वणी तालुक्यातील भालर-लालगुडा, शिंदोला व कायर सर्कलमधल्या विविध गावात सुद्धा जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

समारोपीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव कासावार यांची उपस्थिती राहणार आहे.समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पदयात्रेचे मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.
Rokhthok News

उत्स्फूर्त..अविस्मरणीय, अभूतपूर्व
जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचता आले. प्रत्येक गावात रॅलीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. या यात्रे दरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. प्रत्येक गावात कॉर्नर सभा तर मुख्य बाजारपेठेत सभा घेण्यात आली. या यात्रेदरम्यान अनेक गावातील नागरिकांनी पक्ष प्रवेश केला.
– डॉ. महेंद्र लोढा, मुख्य समन्वयक, जनसंवाद यात्रा