Home Breaking News Macroon शाळेला शिक्षण विभागाचा “दणका”

Macroon शाळेला शिक्षण विभागाचा “दणका”

● प्राथमिक वर्ग बंद करा अन्यथा दरदिवशी दंड ● शिक्षण विभागाने लावले शाळेच्या गेटवर फलक

2068
C1 20240413 00012158
प्राथमिक वर्ग बंद करा अन्यथा दरदिवशी दंड
शिक्षण विभागाने लावले शाळेच्या गेटवर फलक

सुनील पाटील- वणी | तालुक्यातील वडगाव टीप येथे मॅकरून स्टुडंट अकादमी ही प्राथमिक आणि माध्यमिक CBSE शाळा सुरू होती. अॅफीलेशन (Affiliation) परवाना तालुक्‍यातील वडगांव टीप येथील असतांना वर्ग 1 ते 4 प्राथमिक शाळा वणी शहरात शासनाची कोणतीही परवानगी न घेता संस्था चालकाने राजकीय पाठबळ घेत सुरू केली. शिक्षण विभागाने रीतसर कारवाई करत चक्क शाळेच्या प्रवेशद्वारावर फलक लावून पालकांना अवगत केल्याने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. Placing a board at the entrance of the school to inform the parents has created a lot of excitement.

C1 20240413 00023341
हाच तो शिक्षण विभागाचा आदेश

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडंट अकादमी ही CBSE शाळा तालुक्यातील वडगाव टीप हद्दीत चालविण्यात येते. शाळेला CBSE बोर्डाचा संलग्नता (Affiliation) परवाना वडगांव टिप येथील आहे. संस्था चालक पी.एस. आंबटकर यांनी पालक व शिक्षण विभागाची दिशाभूल करत वणीत गंगशेट्टीवार मंगल कार्यालयाजवळ मॅकरूनची सिटी ब्राँच सुरू केली. एक ते चार प्राथमिक वर्ग सन 2023-24 ला सुरू करण्यात आले.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित मॅकरून शाळेला शासन निर्णयाव्दारे वडगाव टिप तहसिल वणी येथे मान्यता दिलेली आहे. यामुळे मुळ मान्यतेच्या ठिकाणीच शाळा सुरु ठेवावी असे शिक्षण विभागाने सुचवले आहे. त्यामुळे अनाधिकृतपणे स्थलातरीत केलेले वर्ग तात्काळ बंद करावेत असे आदेश पारित करण्यात आले आहे. अन्यथा शाळेला दिलेली मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्राथमिक वर्ग सुरू ठेवल्यास दर दिवशी दहा हजार रुपयांचा दंड ठोठविण्यात येणार असल्याचे आदेशीत केले आहे.

प्राथमिक वर्ग सुरू करताना शासनाचे नियम पाळावे लागतात. पैशाने सर्वच साध्य होत नसते हे संस्था चालकाला उमगले नाही. पालिका प्रशासनाची रीतसर ना हरकत घेणे गरजेचे होते. कुठेही “अभिनव “ कल्पना चालत नाही, हेच संस्था चालक विसरले. समोरच बिअर शॉपी असताना चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल हे संस्था चालक विसरतात तेव्हा शिक्षण विभागाने त्यांच्या शाळेची परवानगीच कायमस्वरूपी रद्द करून “मुजोर” संस्था चालकाला धडा शिकवणे गरजेचे आहे.

पाल्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
शासनाने CBSE शाळेच्‍या इमारतीबाबत नियमांवली केलेली आहे यामध्‍ये भौतीक सोयी सुविधेच्‍या उपलब्‍धते बाबत सुचविण्‍यात आले आहे. शाळेची पक्‍की इमारत rcc बिल्‍डींग असावी असा नियम असतांना एकता नगर वणी परिसरातील 1 ते 4 पर्यंतची इंग्रजी माध्‍यमाची मॅकरुन शाळा चक्‍क टिनाच्‍या शेड मध्‍ये आहे.  CBSE  बोर्डाच्‍या नियमांचे तंतोतंत पालन शाळा करते की नाही याची खातरजमा पालकांनी करणे गरजेचे असताना आपल्या पाल्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणताहेत.
Rokhthok News