Home Breaking News भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार 

भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार 

163

* वांजरी येथील घटना

वणी – तालुक्यातील वांजरी येथील शेळी पालन करणाऱ्या इसमाचा जुन्या घराची भीत कोसळून 19 बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री ला घडली. या घटनेत 2 लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वणी परिसरात गेल्या आठवड्या पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतपिका बरोबरच इतरही मोठे नुकसान झाले आहे. वांजरी येथील संतोष करडे हा शेळी पालनाचा व्यवसाय करतो. त्याने नुकतेच गावात नवीन घर बांधले आहे. पावसा पासून बचाव करण्यासाठी त्याने जुन्या घराच्या खोलीत बकऱ्या सोडल्या होत्या. दि 12 सप्टेंबर ला मध्यरात्रीला घराची भिंत कोसळल्याने 19 बकऱ्या जागीच ठार झाल्या तर काही बकऱ्या जखमी झाल्या आहे. यामध्ये संतोष करडे यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्याला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.