Home Breaking News तब्बल…दहा हजार बेरोजगारांनी केली नोंदणी

तब्बल…दहा हजार बेरोजगारांनी केली नोंदणी

● मुलाखत पूर्व प्रशिक्षण आज

515
C1 20231013 08191215

मुलाखत पूर्व प्रशिक्षण आज

MNS Employment Festival | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या रोजगार महोत्सवाचा पहिला भाग मुलाखत पूर्व प्रशिक्षण दिनांक 13 ऑक्टोबरला शेतकरी मंदिरात सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. मनसे चे नेते राजू उंबरकर यांचा हा महत्वाकांक्षी उपक्रम असून तब्बल दहा हजार बेरोजगारांनी केली नोंदणी केली आहे. This is an ambitious initiative of MNS leader Raju Umbarkar and around ten thousand unemployed people have registered.

वणी विधानसभा क्षेत्रात अनेक मोठमोठ्या कंपन्या व उद्योगधंदे असताना सुद्धा येथील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता मनसेच्या वतीने रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील 50 पेक्षा जास्त नामांकित कंपन्या व उद्योग संस्था या महोत्सवात सहभागी होणार आहे.

ग्रामीण भागातील अर्जधारकांसाठी पंचायत समिती निहाय त्या – त्या विभागात हे प्रशिक्षण मेळावे पार पडणार आहे. मेळाव्याच्या पुढील तारखा वेळापत्रका नुसार प्रसिद्ध कऱण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील मेळावे पार पडतील. आपआपल्या भागात पार पडणाऱ्या मेळाव्यात अर्जदारांनी हजर राहुन याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रोजगार महोत्सवात वणी विधानसभा क्षेत्रातील दहा हजार पेक्षा जास्त बेरोजगार युवक – युवतींनी अर्ज नोंदणी केली आहे. ज्या बेरोजगारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी प्रशिक्षण मेळाव्यात आपली नोंदणी करावी अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. अर्ज नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी या मुलाखत पूर्व प्रशिक्षणास उपस्थित राहावे असे आवाहन पक्ष नेते राजु उंबरकर यांनी केले आहे.
Rokhthok News