Home वणी परिसर व्यापारी असोसिएशनच्या वतीने शहिद जवानांना श्रद्धांजली

व्यापारी असोसिएशनच्या वतीने शहिद जवानांना श्रद्धांजली

131

व्यापारी व नागरिक एकवटले

रविवारी सायंकाळी येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने हेलिकॉप्टर अपघातात शाहिद झालेल्या थोर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने व्यापारी व नागरिक सहभागी झाले होते.

भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या हेलिकॉप्टरचा तमिळनाडूतील कुंनूर येथे 8 डिसेंबरला अपघात झाला. यात भारतीय सशस्त्र दलाचे पूर्व चीफ ऑफ डिफेंस सी. डी. एस. जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधूलिका व लष्करी अधिकारी शाहिद झाले.

व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश खुराणा यांनी आपले मनोगत व्यक्त करीत त्या महान सुपुत्रांच्या देशसेवेला भारतातील नागरिक कधीही विसरणार नाही. त्यांची अविस्मरणीय कारकीर्द सदैव स्मरणात राहील असे सांगून उपस्थितांनी मौन पाळले.

यावेळी शहीदांना पुष्पहार अर्पण करून व मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहिली. आयोजित श्रद्धांजली सभेत व्यापारी असोसिएशन चे उपाध्यक्ष प्रशांत गुंडलवार, सचिव अनिल अक्केवार, सहसचिव लवलेश लाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी किशन खुंगर, अनिल झाबक, दिलीप नागदेव, उदय जोबनपुत्रा, रवी निखार, पांडुरंग लांजेवार, संतोष भेळे, गुड्डू भंडारी, इंदर चानना , बन्सी पोपली, आनंद कुकडेजा, शरद मंथनवार, दीकुंडवारजी, उमेश वऱ्हाटे, अनुप खत्री, प्रदीप खत्री, जितेंद्र डाबरे, बंटी सहानी, गिरीश राठी, विक्की पटेल, सुरेंद्र मदान आदी व्यापारी वर्ग व मोठा समुदाय जवानांना श्रद्धांजली देण्याकरिता एकवटला होता.
वणी: बातमीदार