Home Breaking News महायुतीच्‍या प्रचार सभेत मनसेचा “ढाण्‍या वाघ”

महायुतीच्‍या प्रचार सभेत मनसेचा “ढाण्‍या वाघ”

● मुनगंटीवारांना निवडून आणणारच..! ● मनसे नेते उंबरकरांची ग्‍वाही

1094
C1 20240414 13382597

मुनगंटीवारांना निवडून आणणारच..!
मनसे नेते उंबरकरांची ग्‍वाही

सुनिल पाटील-वणी  | महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचारार्थ उपमुख्‍यमंञी देवेंद्र फडणवीस यांची जाहीरसभा येथील शासकीय मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजीत करण्‍यात आली होती. याप्रसंगी मनसेचा ढाण्‍या वाघ राजु उंबरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांना निवडुन आणणारच अशी ग्‍वाही दिली. Public meeting of Deputy Chief Minister Devendra Fadnavis to campaign for Mahayuti candidate Sudhir Mungantiwar

पहिल्‍या टप्‍प्‍यातील चंद्रपुर- वणी -आर्णी लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचाराची रणधुमाळी वातावरणासोबतच तापत आहे. प्रचारसभांचा धडाका शिगेला पोहचला आहे. त्‍यातच महायुतीला महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठींबा दिल्‍याने महाराष्‍ट्र सैनिक निवडणुक रनसंग्रामात ताकदीने उतरले आहे.

महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी यापुर्वीच मनसे नेते राजु उंबरकर यांची सदिच्‍छा भेट घेतली होती. त्‍याप्रमाणेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपली भुमीका स्पष्ट केल्‍यानंतर मनसे नेते राजु उंबरकर यांनी उप‍मुख्‍यमञी देवेंद्र फडणवीस यांच्‍या जाहीर सभेत हजारो समर्थकांसह सभास्‍थळी उपस्थिती दर्शवली.

उंबरकरांचे घणाघाती भाषण
सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रचारार्थ आयोजीत जाहीर सभेत बोलतांना मनसे नेते राजु उंबरकर यांनी घणाघाती भाषणातुन मतदार संघातील समस्‍येवर भाष्‍य केले. त्‍याप्रमाणेच राज ठाकरे यांच्‍या आदेशावरुन महाराष्‍ट्र सैनिक जीवाचं रान करुन मुनगंटीवार यांना निवडुन आणेल अशी ग्‍वाही यावेळी उंबरकरांनी दिली.

मतदारसंघांमध्ये मनसेचे असलेले प्राबल्य बघता देवेंद्र फडणवीस यांनी उंबरकरांचे आभार मानले. तसेच सुधीर मुनगंटीवार यांना जास्तीत जास्त लीड मनसेचा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मनसेच्‍या सर्व अंगीकृत संघटना व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष,  तालुका उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Rokhthok News