Home Breaking News घरावर दगडफेक, खिडक्यांची काचे फोडली, सहा अटकेत

घरावर दगडफेक, खिडक्यांची काचे फोडली, सहा अटकेत

1238

खरबडा मोहल्ल्यात घडली घटना

वणी: येथील खरबडा मोहल्ल्यात वास्तव्यास असलेल्या 32 वर्षीय इसमाच्या घरावर विनाकारण एका टोळक्यांनी दगडफेक केली. ही घटना मंगळवार दि. 13 सप्टेंबर ला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास घडली असून त्याच वेळेस पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

घटनेच्या दिवशी खरबडा येथील दोघे अल्पवयीन मुले रस्त्यावरील गाय चोरून नेत असल्याचा संशय सरोदी मोहल्ल्यातील काही युवकांना आला. त्यांनी त्या दोघांना मारहाण केली आणि चोरी कोणी करायला लावली असे विचारले. तसेच त्यांना पकडून सहा, सात जणांच्या टोळक्याने खरबडा मोहल्ल्यात धडक दिली.

तक्रारदार शेख इस्राईल शेख अब्दुल (32) हे आपल्या परिवारासह खरबडा मोहल्ल्यात वास्तव्यास आहे. ते रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी तो आई व बहिणीसह घरासमोर बसून असताना काही इसम दुचाकीने व काही पळत येतांना दिसले. यामुळे घाबरुन ते घरात गेले व दार बंद केले. त्या टोळक्याने दारावर दगडफेक केली आणि खिडकीची काचे फोडली. घडलेल्या या प्रकाराने आजूबाजूची मंडळी जमा झाली.

दोन गटात वादावादी सुरू असताना तक्रारदार घरातून बाहेर आले यावेळी त्याना नेमका काय प्रकार आहे हे समजले. अश्पाक साहेब खान पठाण व आशीफ खाँ उर्फ माटो हुरमत खान यांनी रस्त्यावरील गायी घेवुन येण्यास त्या अल्पवयीन मुलाला सांगितले व त्याबद्दल तुम्हाला पैसे देतो असे म्हणाल्यावरून तो मुलगा गाय घेऊन येत असताना सरोदी मोहल्ल्यातील तरुणांनी मारहाण केल्याची बाब समोर आली आणि या प्रकरणी कारण नसताना घरावर दगडफेक केल्याची तक्रार शेख इस्राईल शेख अब्दुल यांनी पोलिसात नोंदवली.

याप्रकरणी पोलिसांनी तुषार उर्फ तुळशीराम भगवान काकडे (27), सतीश शंकर वाघाडकर (21), सुनिल पंजाबराव वायकर (22), गणेश किसन साळुंके (22) सर्व रा. गोकुलनगर, सगर गुलाब रासेकर (31), ओमप्रकाश उर्फ सोनु बबन नरड (30) रा. पटवारी कॉलनी वणी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर काही इसम पोलीसांना पाहुन पळुन गेलेत.

घटनास्थळी नमुद इसमांच्या दुचाकी वाहन क्रमांक MH 29BA 4351, MH 29-AQ 1679, MH 29-L7820, MH 29-AP2995, MH 29 AF 1642 अशा मोटर सायकल मिळुन आल्या. याप्रकरणी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या आदेशानुसार API माया चाटसे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शिवाजी टिपूर्णे पुढील तपास करत आहे.
वणी: बातमीदार