Home Breaking News ‘धूमस्टाईल’ दुचाकीस्वार आणि टवाळखोर ‘झुंड’

‘धूमस्टाईल’ दुचाकीस्वार आणि टवाळखोर ‘झुंड’

1368
C1 20240404 14205351

5 रेसर गाड्यांवर कारवाई
वाहतूक शाखा एक्शन मोडवर

रोखठोक |:– शहरात ‘धूमस्टाईल’ दुचाकीस्वार आणि त्या टवाळखोर टोळक्यांनी चांगलाच कहर केला आहे. शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्गाच्या मार्गावर चाललेला थरार निरापधारांच्या जीविताला धोका निर्माण करणारा आहे. हेच टवाळखोर पोलिसांच्या रडारवर असून दोन दिवसात वाहतूक विभागाने पाच रेसर दुचाकीवर कारवाई केली आहे.

दुचाकी व चारचाकी उत्पादन कंपन्यांनी बाजारात नवनवीन गाड्या विक्रीला आणल्या आहे. यामध्ये धनदांडग्यासाठी किंबहुना त्यांच्या अपत्यांची हौस पूर्णत्वास जावी याकरिता रेसर वाहने बाजारात उपलब्ध केली आहे. तरुणात रेसर बाईक ची चांगलीच क्रेज आहे, व पालकांनी आपल्या पाल्यांच्या आग्रहाखातर त्या बाईक त्यांना दिल्या आहेत.

शहरातील वरोरा मार्ग, नांदेपेरा मार्गावर, विठ्ठलवाडीतील डीपी रोड हा मार्ग याच धूम स्टाईल बायकर्स करिता पर्वणी ठरत आहे. श्रीमंतीची हौस आणि उफाळतं तारुण्य, धूमस्टाईल बाईकर्सचा आततायीपणा अनेक लहानसहान अपघातांना निमंत्रण देत आहे. या अशाच प्रकारामुळे नांदेपेरा मार्गावर एका महिलेला जीव गमवावा लागला होता.

वाहतूक विभाग शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीवर लक्ष केंद्रित करताहेत. त्यातच धूमस्टाईल दुचाकीस्वार आणि टवाळखोर यांचा चाललेला मुजोरपणा मोडीत काढण्यासाठी वाहतूक शाखेचे सपोनि संजय आत्राम व पथकांनी धरपकड मोहीम आरंभली आहे. पाच रेसर बाईक वर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे ही कारवाई अतितीव्र असणार आहे.
वणी: बातमीदार

Please Join….

https://chat.whatsapp.com/Gt1y2Ym6OLwAAdVWDTIhDa