Home Breaking News तरुणाने गळफास लावून संपवले ‘जीवन’

तरुणाने गळफास लावून संपवले ‘जीवन’

● तरुणांच्या आत्मघाती निर्णयाने गावात शोककळा पसरली आहे.

2685
C1 20231015 12031330

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Sad News Wani | तालुक्यातील पठारपूर येथे वास्तव्यास असलेल्या 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून जीवन संपवले. ही घटना रविवार दिनांक 15 ऑक्टोबर ला पहाटे उघडकीस आली. तरुणांच्या आत्मघाती निर्णयाने गावात शोककळा पसरली आहे. A 25-year-old youth ended his life by hanging himself.

शंकर तुकाराम मंगाम (25) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह पठारपूर येथे वास्तव्यास होता. कायर- पठारपूर मार्गावर असलेल्या एका लेआऊट मधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत तो आढळून आला.

प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक हा आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याचे कळते. त्याचे पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही.
Rokhthok News

Previous articleअल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
Next articleविषाचा घोट….वृद्धाची आत्महत्या
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.