Home Breaking News त्या…निर्घृण हत्येतील आरोपीला ‘अटक’

त्या…निर्घृण हत्येतील आरोपीला ‘अटक’

1192

राजूर कॉलरीतच बसला होता दडून

वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे 45 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या गुरुवारी पहाटे करण्यात आली होती. भाडेकरूनेच घरमलकाच्या डोक्यात मसाले वाटण्याचा दगडी पाटा घातला होता. या खळबळजनक घटनेने संपूर्ण गाव हादरलेले असताना पोलिसांनी आरोपीला गावातूनच ताब्यात घेतले आहे.

राजू पोचम बोडपेलवार (45) असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. तो मिस्त्रिकाम करायचा, त्याने आपल्या घराची एक खोली राकेश केवट (40) याला भाडेतत्त्वावर दिली होती. परंतू तो दरमहा घरभाडे देत नसल्याने बुधवारी सायंकाळी घरमालकाने भाडेकरुला खडसावले. यात वाद निर्माण झाला शाब्दिक चकमक झाली. काही कालावधीनंतर वाद निवळल्याने घरमालक झोपी गेला.

रागाने तापलेल्या भाडेकरूच्या मनात वेगळेच कारस्थान सुरू होते. त्याला झोप येत नव्हती, ही कटकट एकदाची संपवण्याचा निर्णय त्याने घेतला. रागाच्या भरात घराच्या बाहेर ठेवलेले मसाला वाटण्याचा पाटा उचलला व गाढ झोपलेल्या घरमालक राजू च्या डोक्यात घातला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घडलेल्या भीषण आणि निर्घृण हत्तेबाबत गुरुवारी पहाटे शेजाऱ्यांना कळताच एकच कल्लोळ झाला. पोलिसांना सूचित करण्यात आले, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. मात्र हत्त्या करणारा आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी हत्त्या करणाऱ्या राकेश ला ताब्यात घेण्याची विव्हरचना आखली आणि दुपारी 3:45 वाजता राजूर येथील एका घरात दडून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.
वणी: बातमीदार