Home Breaking News कोळसा सायडिंग व कोल डेपोवर होणार कारवाई

कोळसा सायडिंग व कोल डेपोवर होणार कारवाई

648
Img 20240613 Wa0015
आ. बोदकूरवार व संघर्ष समितीला यश
अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा

वणी: राजूर येथे नव्याने सुरू असलेले रेल्वे कोळसा सायडिंग, कोल डेपो आणि राजूर रस्त्यावर होणारी जडवाहतुक कोणतीही परवानगी न घेता सुरू आहे. याविरोधात राजूर बचाव संघर्ष समितीने ‘एल्गार’ पुकारला आहे. दि.15 सप्टेंबरला आ. संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्यासह समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेवून खरे वास्तव निदर्शनास आणून दिले असता कारवाई करण्यात येणार असे आश्वस्त केले.

तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित राजूर गावात नवनवीन कोळसा कंपन्या येत असून रहिवासी क्षेत्रालगत त्यांच्या कोळसा सायडिंग व कोल डेपो उभारल्या जात आहेत. त्यामुळे गावात प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. राजूर बचाव संघर्ष समिती चे माध्यमातून नियमबाह्य रेल्वे कोळसा सायडिंग, कोल डेपो आणि राजूर रस्त्यावर होणारी जडवाहतुकीबाबत गेल्या सहा महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे.

जिल्हाधिकारी यांनी अभ्यास समिती नेमून उपविभागीय अधिकारी यांचे कडून अहवाल मागवून नियम बाह्य कोळसा रेल्वे सायडिंग व कोल डेपोवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे अभिवचन दिले आहे. मात्र यानंतरही कोळसा सायडिंग व कोल डेपो बंद न झाल्यास राजूर बचाव संघर्ष समिती नव्याने तीव्र आंदोलन करेल असा इशारा समितीने दिला आहे.

याप्रसंगी राजूर बचाव संघर्ष समितीचे संघदीप भगत, डेव्हिड पेरकावार, मो. असलम, अशोक वानखेडे, कुमार मोहरमपुरी, अनिल डवरे, नंदकिशोर लोहकरे, रियाजुल हसन, जयंत कोयरे, सावन पाटील, राहुल कुंभारे,सुरेश सिंग, अजय कंडेवार यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार

C1 20240529 15445424