Home Breaking News वेकोलीच्या ब्लास्टिंग मुळे घरांना पडले ‘तडे’

वेकोलीच्या ब्लास्टिंग मुळे घरांना पडले ‘तडे’

611

नुकसान भरपाईची मागणी

वणी: कोळसा उत्खनन करताना तीव्र स्वरूपाचे ब्लास्टिंग करण्यात येत असल्यामुळे या परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणावर घरांना तडे जाऊन घरांचे नुकसान होत आहे. तरी वेकोलीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते तथा इंदिरा सहकारी सुतगिरणीचे संचालक दिनकर पावडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तालुक्यातील घोन्सा येथे 2002 पासून भूमिगत खदान सुरू झाली होती. त्यानंतर 2008 पासून खुली खदान सुरू झाली आहे. या कोळसा खदानी मधून मोठया प्रमाणात कोळशाचे उत्खनन करण्यात येते याकरिता होत असलेले ब्लास्टिंग प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतानाच परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणावर तडे जाताहेत.

वणी तालुका हा गौण खनिजाचे नटलेला आहे. या तालुक्यात अनेक कोळशाचे खाणी आहेत. या खाणी मुळे विस्थापितांच्या समस्या, ब्लास्टिंग मुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे या परीसरातील नागरिकांचे जीवन कष्टमय झाले आहे.

घोन्सा गावातील पंचशील नगर, आठवडी बाजार परिसर, बिरसा मुंडा परिसरात या खदानीतील ब्लास्टिंग मुळे घरांना तडे गेले आहेत. सातत्याने होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे अनेक घरांचे अतोनात नुकताच झाले आहे. भविष्यात जीवित हानी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिकांचा रोष बघता वेकोलीने तीव्र स्वरूपाचे ब्लास्टिंग बंद करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन SDO यांना दिले. याप्रसंगी दिनकर पावडे यांच्या सोबत घोन्सा येथील सरपंच मंगेश मोहूर्ले, महेश उराडे, अशोक बेसरकर, दिलीप काकडे, अरुण रामटेके, मंगेश तलांडे, प्रमोद पोटे, मंगला बेसरकर आदी नागरिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार