Home वणी परिसर कृषीच्या विद्यार्थ्यांने केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषीच्या विद्यार्थ्यांने केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

354

* किड नियंत्रणाबाबत दिली माहिती

वणी बातमीदार: डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ, अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा येथील विद्यार्थी रोहन बंडू वांढरे याने तालुक्यातील दहेगाव  येथे झालेल्या  कार्यक्रमात किड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मागील काही वर्षांपासून शेतपिकावर विविध रोगाचे आक्रमण होत आहे. बळीराजा आस्मानी संकटाचा सामना करताहेत त्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळावा याकरिता कृषी महाविद्यालयाचे विध्यार्थी सरसावले आहेत. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 अंतर्गत विद्यार्थी रोहन बंडू वांढरे याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी किड नियोजना साठी कामगंध सापळे, पिवळ्या रंगाचा चिकट सापळा इत्यादी शेतात कशाप्रकारे आणि कोणत्यावेळेस लावावे याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी दहेगाव येथील शेतकरी बंडू असुटकर , बंडू वांढरे, चंपत मडावी,  सुनील उलमाले, अनिल ठावरी, अदित्य येरगुडे, आशिष येरगुडे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी विशाल भाकडे, किटकशास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. काजल माने, प्रा.कृतिका इंझालकर आणि प्रा. स्नेहल आत्राम यांचे या विद्यार्थ्यांला मार्गदर्शन लाभले.