Home वणी परिसर रोटरी क्लब वणीचा पदग्रहण समारोह

रोटरी क्लब वणीचा पदग्रहण समारोह

247
C1 20240404 14205351
◆नवनियुक्त अध्यक्षांनी स्वीकारला पदभार

वणी:- येथील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या नवीन कार्यकारणी चा पदग्रहण समारोह होटेल जन्नत मध्ये झाला. या कार्यक्रमात वर्ष 2020- 21 चे अध्यक्ष रोटे. निखिल केडिया यांनी आपला पदभार नवनियुक्त अध्यक्ष रोटे. विनोद खुराणा यांना सोपविला तसेच वर्ष 2020 -21 चे सचिव रोटे. आशीष गुप्ता यांनी सचिव पदाचा पदभार रोटे. डॉ. परेश पटेल यांना सोपविला.

या कार्यक्रमात 9 नवीन सदस्यांनी रोटरी क्लब मध्ये प्रवेश घेतला.   या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रोटे. किशोर केडिया व अतिथी म्हणून रोटे. मुरली  लाहोटी, निमंत्रित अतिथी म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व वणी पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के उपस्थित होते.

निखिल केडिया यांनी प्रस्ताविकातून कोविड काळातील मागील वर्षीच्या कामाचा आढावा सादर केला.  या प्रसंगी अतिथींनी नवनिर्वाचित कार्यकरिणीला शुभेच्छा देऊन विविध सामाजिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन रोटे शहाबुद्दीन अजानी यांनी केले  तर आभार प्रदर्शन डॉ. परेश पटेल यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.