Home राजकीय पणन प्रतिनीधीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

पणन प्रतिनीधीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

510

वसंत जिनींगची सभा अनिर्णीत

येथिल वसंत जिनींग फॅक्टरीच्या संचालक मंडळामधुन पणन महासंघावर प्रतिनीधी पाठविण्यासाठी वसंत जीनिंग ची सभा  घेण्यात आली. मात्र दोन व्यक्तींची नावे समोर आल्याने व दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सभा अखेर अनिर्णित ठेवावी लागली तर दोघापैकी एकाचे नाव निश्चित करण्यासाठी दोन्ही नावे पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात माळ टाकते याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

आगामी दोन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते ‘चार्ज’ होत खलबते आखणीला लागले आहे. पणन महासंघाचीही निवडणूक होऊ घातली आहे.

त्यामुळे येथिल वसंत जिनिंग फक्टरी व खरेदी विक्री संघाला त्यांचे प्रतिनिधी पाठविण्यासाठी पणन महासंघाने पत्र पाठविले आहे. म्हणूनच वसंत जीनींग फक्टरीच्या संचालक मंडळातून प्रतिनिधी पाठवण्यासाठी  संचालक मंडळाची सभा घेण्यात आली.

सभेमध्ये हा विषय पटलावर आल्यानंतर विद्यमान अध्यक्ष अँड देविदास काळे व संचालक प्रमोद वासेकर यांची नावे सूचविण्यात आली दोघांपैकी एकाने आपले नाव मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला परंतु कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. यासाठी मतदान घ्यावे अशीही सूचना काही संचालकां कडून  आली.

परंतु निवड अविरोध व्हावी असे मत काही संचालकांनी व्यक केले. वसंत जिनिग संस्था काँग्रेसच्या ताब्यात आहे. आणि दोन्ही उमेदवार काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे या निर्णयाचा चेंडू आता माजी आमदार वामनराव कासावार व खासदार बाळू धानोरकर यांच्या कोर्टात गेल्याने पक्षश्रेष्ठी कोणाला माळ घालतात याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहेत.

साहेब आम्हाला संधी कधी

तर सहकार क्षेत्रात काँग्रेसचे तेच तेच चेहरे पुढे केले जातात  नविन कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असा सुर सुद्धा काँग्रेसचा गोटातून व्यक्त होत आहे. मात्र पणन महासंघाच्या निवडणुकीत या मतदार संघात केवळ बोटावर मोजण्या इतकेच मतदार असल्याने प्रतिनिधीला बहुमोल महत्व असते. आता काही दिवसातच सहकार क्षेत्राच्या निवडणुका होणार असल्याने नवीन चेहेऱ्याना स्थान मिळेल का हे येणारा काळच सांगणार आहे.

वणी : बातमीदार