Home वणी परिसर गोंडी नृत्यांचे आयोजन, औचित्य बिरसा मुंडा जयंतीचे

गोंडी नृत्यांचे आयोजन, औचित्य बिरसा मुंडा जयंतीचे

262

मागील 7 वर्षापासून चालत आहे ही परंपरा
कार्यक्रमाला हजारोंची उपस्थिती…

तालुक्यातील मोहर्ली येथे बिरसा मुंडा कमिटीच्या वतीने दिनांक सोमवार दि.15 नोव्हेंबरला सायंकाळी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर बिरसा मुंडा जयंती भव्य स्वरूपात व हजारोंच्या उपस्थित साजरी करण्यात आली. याप्रसंगी गोंडी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस वामनराव कासावार हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष इजाहर शेख हे होते. प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. मोरेश्वर पावडे, संतोष पारखी, प्रमोद निकुरे, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, अभिजित सोनटक्के, निलेश परगंटीवार, सुधीर पेटकर, ऍड माहातडे, सचिन चापडे, सरपंच दिपमाला वडस्कर, उपसरपंच धनराज टेकाम, तंटामुक्त अध्यक्ष गजानन टेकाम उपस्थित होते.

याप्रसंगी वामनराव कासावार, इजहार शेख व मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे पारंपरिक गोंडी नृत्याने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिरसा मुंडा कमिटीचे अध्यक्ष शंकर टेकाम यांनी केले यावेळी ते म्हणाले की, बिरसा मुंडा जयंती गेल्या 7 वर्षांपासून भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. यामागील उद्देश समाजामध्ये पारंपरिक चालीरीतीची आवड व समाज जागृत करणे असे विचार प्रस्ताविकातून व्यक्त केले. तसेच वामनराव कासावार, डॉ मोरेश्वर पावडे यांनी बिरसा मुंडा विषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी राणी दुर्गावती डांस ग्रुप च्यावतीने संस्कृतीक कार्यक्रमात पारंपरिक गोंडी नृत्य भव्य प्रमाणात सादर करण्यात आले यामध्ये कोतरु नृत्य, धनोडी नृत्य सादर करण्यात आले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय उरकुडे यांनी केले तर आभार बोबडे यांनी मानले. याठिकाणी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ने परिसरातील मारेगाव, पेटूर, मांजरी, विरकुंड, सुकनेगाव, रासा येथील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शंकर टेकाम, भालचंद्र मेश्राम, गणेश टेकाम, लखन कनाके, छाया मडावी व बिरसा मुंडा कमिटीने परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार