Home Breaking News विमा कंपनी विरोधात शेतकरी ‘संतप्‍त’

विमा कंपनी विरोधात शेतकरी ‘संतप्‍त’

425

धरणे आंदोलनात व्‍यक्‍त केला रोष

रोखठोकः खरीप हंगामाच्‍यावेळी कोसळणारा सततचा पाऊस, अतिवृष्टी व महापुरामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने वणी विभागात 90 टक्‍के नुकसान भरपाई मान्य केली माञ पिक विमा कंपन्‍यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली. अवघी 12 ते 14 टक्‍के नुकसान भरपाई दिल्‍याने शेतकरी संतप्‍त झाला असुन भाजपाचे विजय पिदुरकर यांचे नेतृत्त्‍वात एकदिवसीय धरणे आंदोलन करुन शंभर टक्‍के नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्‍यात आली आहे.

नैसर्गीक आपत्‍तीने बेजार वणी विभागातील शेतकरी पिक विमा कंपनी कडून मदतीची अपेक्षा करतोय. माञ देण्‍यात आलेली नुकसान भरपाई अतिशय तोकडी आहे. यामुळे शेतकरी संतप्‍त झाला असुन रोष व्‍यक्‍त करताहेत. पिक विमा धारक शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने देत अवगत केले आहे माञ संबधीत विमा कंपनी ऐकण्‍याच्‍या मानसिकतेत नाही. यामुळे दि. 16 जानेवारीला एक दिवसीय धरणे आंदोलन करुन आपला संताप व्‍यक्‍त केला आहे.

वणी तालुक्यात वहितीखालील पेरणी क्षेत्र 64 हजार हेक्‍टर आहे यातील 53 हजार 966 हेक्‍टरवर पिकांकरीता शासनाने 90 टक्‍के नुकसान भरपाई दिली आहे. माञ पिक विमा कंपन्‍यांनी अत्‍यल्‍प नुकसान भरपाई कशी काढली हेच कळायला मार्ग नसल्‍याचे मत आंदोलकांनी व्‍यक्‍त केले आहे. तालुक्‍यातील बाधीत शेतकऱ्यांना तातडीने शतप्रतिशत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्‍यात आली आहे.

संबधांत अधिकारी व विमा कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असुन या कृतीमुळे शेतकऱ्यामध्ये तिव्र असंतोष आहे. तक्रार निवारण समिती प्रशासन व विमा कंपनी विरोधात प्रथमतः एकदिवसीय धरणे आंदोलन करण्‍यात आले. त्याप्रमाणेच जोपर्यंत शंभर टक्‍के मदत मिळत नाही तो पर्यंत आंदोलनाची तिव्रता वाढणार अशी शक्‍यता आदोंलकांनी व्‍यक्‍त केली आहे.
वणी: बातमीदार

Previous articleखेळामुळे मन, बुद्धी व शारिरीक विकास
Next articleACB च्या जाळ्यात अडकला ‘नगरसेवक’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.