Home Breaking News अखेर…शेतकऱ्यांना कोट्यवधी चा गंडा घालणारा व्यापारी अटकेत

अखेर…शेतकऱ्यांना कोट्यवधी चा गंडा घालणारा व्यापारी अटकेत

1140

तीन महिन्यापासून होता फरार

वणी: शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करून तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांचा गंडा घालणारा व्यापारी तीन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तर अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्नरत “ठगाच्या” मुसक्या अवळण्यात वणी पोलिसांना यश आले आहे.

धीरज सुराणा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो बन्सल लेआऊट मध्ये वास्तव्यास असून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकत घेणारा व्यापारी आहे. वर्धमान ट्रेडिंग कंपनीत भागीदार असलेल्या सुराणा व त्याचा जमीनदार रुपेश नवरत्नमल कोचर यांनी संगनमत करून जानेवारी महिन्यात 147 शेतकऱ्याचे जवळपास 1 हजार 935 क्विंटल सोयाबीन खरेदी केले मात्र एक दमडी सुद्धा शेतकऱ्यांना न देता पोबारा केला होता.

इनाम योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचा चुकारा, बाजार समितीची बाजार फी, शासनाची सुपरव्हिजन कॉस्ट फी आणि अडत्याची अडत असा एकूण 1 कोटी 15 लाख 26 हजार 46 रुपये ऑनलाइन जमा करणे गरजेचे होते. मात्र त्या व्यापाऱ्यांनी शेतकरी, बाजार समिती, शासन आणि अडते यांची फसवणूक केल्या प्रकरणी वणी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तीन महिन्यापासून फरार असलेल्या दोन्ही आरोपी पैकी जमानतदार असलेल्या कोचर याला जमीन मिळाला होता मात्र सुराणा याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला नाही. तसेच तो पोलिसांना सुद्धा शरण आला नाही. सोमवारी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना ठगबाज आरोपी आपल्या घरी आल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस उप निरीक्षक शिवाजी टिपूर्णे व पथकाने आरोपी सुराणा याच्या सोमवारी दुपारी मुसक्या आवळल्या आहेत.
वणी: बातमीदार