Home वणी परिसर लसीकरण मोहिमेला सामाजिक संघटनेचा हातभार

लसीकरण मोहिमेला सामाजिक संघटनेचा हातभार

371

1000 सिरिन्ज पालिकेच्या सुपूर्त

शहरातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस मिळावी या करिता नगर पालिका प्रशासन धडपड करीत आहे. सूरु असलेल्या मोहिमेत आपलाही हातभार लागावा याकरिता वणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशने 1000 सिरिन्ज पालिकेच्या सुपूर्त केल्या.

मागील दोन वर्षांत कोरोनाने चांगलाच कहर केला. या विषाणूजन्य आजाराने अनेकांचे बळी घेते आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मात्र अजूनही अनेकांनी लस घेतली नसल्याने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या पुढाकाराने शहरात 17,18,व 19 नोव्हेंबर ला विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी हजाराच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेला नागरिकां कडून आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपलाही हातभार लागावा या करिता सामाजिक संघटना सरसावल्या आहे.

येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशने पालिका प्रशासनाला निशुल्क सिरिन्ज देण्याचा निर्णय घेतला व 1000 सिरिन्ज केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे, सचिव जितेंद्र डाबरे, उजवल पांडे, शंकर नागदेव, भरत जोबणपुत्रा, अजय खटोड, अंकुश कोठारी, उमाकांत भोजेकर, लक्ष्मीकांत हेडाऊ, शैलेश बाफना व पंकज कासावार यांनी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या सुपूर्त केल्या आहे.

वणी : बातमीदार

Previous articleमॅकरून मध्ये बालकदिन उत्साहात साजरा
Next articleआदर्श सरपंच पेरे पाटील सोमवारी वणीत
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.