Home Breaking News वृद्धाने घेतला गळफास

वृद्धाने घेतला गळफास

590

कोना येथील घटना

वणी:-तालुक्यातील कोना या गावातील 72 वर्षीय वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे.

जनार्धन ढवस असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे.तो कोना येथील रहिवासी आहे.गावातील जुन्या वस्तीत तो पत्नीसह वास्तव्यास होता.दि 19 जानेवारीला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास पत्नी कामानिमित्ताने घराबाहेर गेली असता वृद्धाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली पत्नी घरी आल्यावर ही घटना उजेडात आली आहे.
वणी : बातमीदार