Home Breaking News Corona update..|| वणीत 9 तर जिल्ह्यात 200 कोरोना “पॉझिटिव्ह”

Corona update..|| वणीत 9 तर जिल्ह्यात 200 कोरोना “पॉझिटिव्ह”

598

जिल्ह्यात 66 महिला व 134 पुरूष बाधित
56 कोरोनामुक्त तर एक मृत्यू

वणी : कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. प्रशासन सतर्क झाले असून कोविड त्रिसूत्रीचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन करण्यात येत आहे. बुधवार दि. 19 जानेवारीला जिल्ह्यात 66 महिला व 134 पुरूष बाधित आढळलेत. यात वणी तालुक्यातील 9 तर जिल्ह्यात 200 कोरोना “पॉझिटिव्ह” निष्पन्न झालेत.

संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 200 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 56 जण कोरोनामुक्त झाले असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 881 व बाहेर जिल्ह्यात 23 अशी एकूण 904 झाली असून त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 863 गृहविलगीकरणात आहेत.

बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या 200 रूग्णांमध्ये 66 महिला व 134 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात 16, बाभुळगाव सहा, दारव्हा एक, दिग्रस चार, घाटंजी 11, कळंब 13, महागाव एक, मारेगाव दोन, नेर 39, पांढरकवडा 29, पुसद पाच, राळेगाव 11, उमरखेड दोन, वणी नऊ, यवतमाळ 40, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील 10 रूग्णांचा समावेश आहे.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
वणी : बातमीदार

Previous articleBreaking…|| नगर पंचायतीत काँग्रेस, शिवसेनेला कौल
Next articleवृद्धाने घेतला गळफास
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.