Home Breaking News भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी

भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी

● ओव्हरटेक करणे जीवावर बेतले A

2424
Image Search 1716133936481
Img 20240613 Wa0015

ओव्हरटेक करणे जीवावर बेतले

Accident News | तालुक्यातील बेलोरा फाटा शिवारात भरधाव दुचाकी समोर जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात भिडली. यात एकाचा घटनास्थळी च मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. One died on the spot while two others were injured

मुन्ना उर्फ जित अजय गोवर्धन (17) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो मुरसा, तालुका भद्रावती येथील निवासी होता. नायगाव येथे लग्न समारंभाचा कार्यक्रम असल्याने दुचाकी क्रमांक MH-34-BQ-2947 ने आपले मित्र हर्षल अर्जुनकर व प्रणय शंकर नवले यांचेसह जात होते. बेलोरा फाटा शिवारात वाणीकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक MH-34-BG-3783 ला ओव्हरटेक करण्याच्या नादात नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला.

अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पोलिसांना घटनेची माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला असून जखमींना उपचारार्थ हलविण्यात आले आहे. पुढील कार्यवाही ठाणेदार माधव शिंदे यांच्या आदेशाने सुनील दुबे करताहेत.
Rokhthok News

C1 20240529 15445424