Home वणी परिसर अभिनय स्पर्धेत प्रा हेमंत चौधरी द्वितीय

अभिनय स्पर्धेत प्रा हेमंत चौधरी द्वितीय

171

वणी :- मारेगाव कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी यांनी देश पातळीवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन अभिनय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

प्राचार्य हेमंत चौधरी हे उत्कृष्ठ नाटक कलावंत म्हणून परिचित आहे.त्यांनी अनेक नाट्य स्पर्धा गाजवून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे.कोरोना काळात नाट्यसृष्टी ठप्प होती.त्यामुळे कलाकारांना आपली कला सादर करता आली नाही त्याकरिता मुंबई येथील उमंग ग्लोबल या संस्थेने ऑनलाईन अभिनय स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत देशभरातून 850 कलाकारांनी आपले अभिनय सादर केले होते.स्पर्धे मध्ये 30 परीक्षकांनी परीक्षण केले यामध्ये प्राचार्य हेमंत चौधरी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.त्यांच्या या यशामुळे त्यांचे वर अभिनंदना चा वर्षाव होत आहे.तसेच बक्षिसाची मिळालेली रक्कम कोविड फंडात देण्यात येणार असल्याचे प्राचार्य चौधरी यांनी माहिती दिली आहे.