Home Breaking News त्‍या….अत्‍याचारी आरोपीला शिताफीने अटक

त्‍या….अत्‍याचारी आरोपीला शिताफीने अटक

● आठ महिन्‍यापासुन होता फरार

951
C1 20240220 14194090
C1 20240404 14205351

आठ महिन्‍यापासुन होता फरार

Crime News : आठ महिन्‍यापुर्वी अल्‍पवयीन बालीकेवर लैगिंक अत्‍याचार करुन आरोपी पसार झाला होता. त्‍याचा ठावठिकाणा शोधण्‍याचा प्रयत्‍न पोलीसांनी केला माञ तो मिळुन येत नव्‍हता. त्‍यातच पोलीसांना गोपनिय बातमीदारांने फरार आरोपी दुर्गापुर जिल्‍हा चंद्रपुर येथे असल्‍याची माहिती देताच पोलीसांनी शिताफीने त्‍याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. The accused had sexually assaulted a minor girl and escaped.

आझम शेख बाबा शेख (27 )असे अत्‍याचारी आरोपींचे नांव आहे. तो वार्ड क्रमांक तीन दुर्गापुर जिल्‍हा चंद्रपुर येथे वास्‍तव्‍यास होता. आठ महिन्‍यापुर्वी त्‍यांने अल्‍पवयीन बालीकेवर अत्‍याचार केला होता. याप्रकरणी पोलीसांनी 11 जुलै 2023 ला गुन्‍हा नोंदविला आहे. तो तेव्‍हा पासुन फरार झाला होता तर पोलीसांना हुलकावणी देत होता.

दुर्गापुर येथे आरोपी असल्‍याची गोपनिय माहिती ठाणेदार अनिल बेहरानी यांना मिळाली. शिव जंयतीची मिरवणुक संपताच त्‍यांनी एक पथक तातडीने चंद्रपुरला रवाना केले. मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारीला मध्‍यराञी आरोपीच्‍या शिताफीने मुसक्‍या आवळल्‍या. त्‍यांचेवर विविध कलमान्‍वये पोलीसात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्‍सोड, अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल बेहरानी,  सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे,psi झाडोकार,  विजय वानखडे, शुभम सोनुले गजानन कुडमेथे यांनी पार पाडली.
Rokhthok News