Home वणी परिसर शालेय अभ्यासक्रम 25 टक्क्याने होणार कमी

शालेय अभ्यासक्रम 25 टक्क्याने होणार कमी

228

वणी बातमीदार :

शिक्षण विभागाचा निर्णय

मागील वर्षापासुन कोरोना या महामारीमुळे वर्षभर शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे सर्वच परीक्षा रदद करण्यात आल्या होत्या. या चालु सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये उघडतील अशी आशा होती. मात्र अजुनही ऑनलाईनच्या भरवश्यावर शिक्षणाचा गाडा हाकल्या जात असल्याने विद्यार्थ्यांवर ताण येवू नये म्हणुन यावर्षीच्या अभ्यासक्रम 25 टक्के कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मार्च 2020 मध्ये संपुर्ण देशात टाळेबंदी लावण्यात आली होती. अनेक उदयोगधंदे यामुळे डबघाईस येवून व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. मात्र या कोरोना कालखंडात खरे नुकसान झाले असेल तर ते विद्यार्थ्यांचे. गेल्या वर्षभरापासून शाळा व महाविद्यालये उघडल्याच गेली नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. काही प्रतिष्ठित शाळांनी विध्यार्थ्यांकरिता काहीतरी करत असल्याचा देखावा केला आणि आॅनलाईन वर्ग सुरु केले. या वर्गामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागला. तर ग्रामीण भागातील विध्यार्थी सोयीसुविधे अभावी या आॅनलाईन वर्गापासुन वंचित रहिल्याचे वास्तव नाकारता येत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरसकट विध्यार्थ्यांना परिक्षा न घेताच उत्तीर्ण करण्यात आले.

यावर्षीच्या चालू सत्रात शाळा, महाविद्यालये सुरू होतील असे वाटत असतानाच दुसऱ्या लाटेची त्सुनामी आली. विध्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन महिन्यांपासून शाळा बंद होत्या त्या पूर्ववत सुरू झाल्यात मात्र दोन महिन्याचा खंड पडल्यामुळे तसेच वेळेवर शाळा सुरु  करता आल्या नाहीत. यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणेबाबत समस्या निर्माण होत असल्याने शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता 1 ली ते 12 वी चा पाठ्यक्रम सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता 25 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विध्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या लाभ होणार आहे.