Home वणी परिसर नियमबाह्य दारू विक्री, उत्पादन शुल्कचे धाडसत्र

नियमबाह्य दारू विक्री, उत्पादन शुल्कचे धाडसत्र

553

कारवाई गुलदस्त्यात, सत्यता पडद्याआड

वणी बातमीदार: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिक अस्थापणावर निर्बंध लादले आहे. विहित मुदतीत दुकाने सुरू ठेवण्याचे फर्मान शासनाने निर्गमित केल्यानंतर नियमबाह्य दारू विक्री होत असल्याचे वास्तव सर्वश्रुत आहे. टाळेबंदी चा कालखंड  अनुध्यप्ती धारकांसाठी पर्वणी होती मात्र उत्पादन शुल्क विभागाने रविवार दि. 25 जुलै ला शहरातील काही अनुध्यप्ती धारकावर नाईलाजास्तव अवलंबलेलेे धाडसत्र फार्स तर नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने अनधिकृत दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे कधीतरी दिसते मात्र अनुध्यप्ती धारकावर ठोस कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. मागील एक वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी आहे. परन्तु शासनाच्या महसुलात वाढ व्हावी असाच प्रयत्न संबंधित विभागाचा दिसला. लगतचा जिल्हा दारूबंदी असतांना दारूचा सर्वाधिक महापूर वणी परिसरातून वाहत होता. हजार लोकवस्तीच्या गावातील दारुभट्टीतून दररोज 300 ते 500 दारूच्या पेट्यांचा खप होत होता. याबाबतची आकडेवारी त्याच विभागात उपलब्ध आहे.

रविवारी अनधिकृत दारू विक्री करणाऱ्या शहरातील काही अनुध्यप्ती धारकावर उत्पादन शुल्क विभागाने धाडसत्र अवलंबले परन्तु नेमकी काय कारवाई केली हे गुलदस्त्यात असून सत्यता अद्याप पडद्याआड आहे. केलेल्या कारवाईचा उहापोह होणार नाही याची दक्षता मात्र संबंधित विभागाने घेतल्याचे दिसत असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीर्याने घेत कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.