Home वणी परिसर त्या…आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

त्या…आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

389

– अभिष्टचिंतन सोहळाचे औचित्य

– वृक्षारोपण व फळ वाटप

दीपक डोहणे : मारेगाव:  येथील स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन आरोग्य कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

मारेगाव तालुक्यातील  स्वराज्य शेतकरी युवा  संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या जन्मदिवसा निमित्त आज दि.३१ रोजी  येथील प्राथमिक आरोग्य विभागातील भरती रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय,  सुरक्षारक्षक, अशा या कोरोना योद्धाचा शाल व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे औचित्य साधुन मारेगाव बस थांबा नजीक दुभाजकच्या मधोमध वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांना शंभर वृक्ष भेट देवून निसर्गाचा समतोल राखन्यासाठी वृक्षारोपणची भूमिका विषद करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक कोकास होते. जिल्हाध्यक्ष सचिन पचारे, विधानसभा प्रमुख विशाल किन्हेकार, तालुका प्रमुख सोमेश्वर गेडेकर, शहर संघटक विजय मेश्राम, उपाध्यक्ष राजू मांदाडे, शहर प्रमुख प्रवीण काले, विजय राऊत, अनिल राऊत, भास्कर वेले, राजू खडसे, अतुल पचारे, गोपाल खामनकर, तुकाराम वासाडे, अमोल घोरपडे, उमेश उलमाले, लक्ष्मण चावके यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.