Home वणी परिसर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

124

मराठा सेवा संघाच्या वतीने ऑनलाईन चारोळी स्पर्धा

वणी बातमीदार: साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मराठा सेवा संघ व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने स्थानिक अण्णाभाऊ साठे चौक, येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे  यांचे साहित्य जागतिक स्तरावरचे आहे. त्यांना उजाळा देण्यासाठी व त्याचा प्रचार करण्यासाठी मराठा सेवा संघ मागील 30 वर्षापासून त्यांचा जन्मदिवस “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा करत असतो. त्यासाठी आज मराठी भाषा या विषयावर ऑनलाईन चारोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, जिल्हा संघटक ऋषीकांत पेचे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद चे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बोरकुटे, दत्ता डोहे, संजय गोडे, विलास शेरकी, मारोती जीवतोडे, भाऊसाहेब आसुटकर, प्रतिक राणा, निकेश भोस्कर महादेव खंडाळे, नितीन मोवाडे उपस्थित होते.