Home वणी परिसर दुचाकीच्या अपघातात मधुकर वाढई यांचा मृत्यू

दुचाकीच्या अपघातात मधुकर वाढई यांचा मृत्यू

165

वणी बातमीदार:-  वेकोली मध्ये कार्यरत मधुकर गणपत वाढई वय 55 हे नोकरीवरून घरी येत असतांना त्यांच्या दुचाकी वाहनाला डुकराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.

येथील लक्ष्मी नगर मधील रहिवासी मधुकर वाढई हे वेकोलीच्या कार्यालयातून दि. 31 जुलैला वणीला येत असतांना गुंजेच्या मारोतीजवळ चौपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तिथे अचानक एका डुकराने यांची दुचाकी क्रमांक एम. एच. 29 बी. एल. 0962 वर येऊन धडकल्याने अपघात झाला. या वेळी वाढई हे शिरस्त्राण घालून असतांना देखील ते इतक्या जोराने दगडावर आदळले की शिरस्त्राण तुटून त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. परंतु दि. 1 ऑगस्टला रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली व मोठा आप्त परिवार आहे. आज दि. 2 ऑगस्टला येथील मोक्षधमवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे..