Home वणी परिसर मॅकरुन स्टुडंन्टस अकॅडमीचे घवघवीत यश

मॅकरुन स्टुडंन्टस अकॅडमीचे घवघवीत यश

136

CBSE दहावीचा शतप्रतिशत निकाल

वणी बातमीदार:- जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशी परिस्थिती असून सुद्धा ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांच्या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मॅकरुन स्टुडंन्टस अकादमीने घवघवीत यश मिळवले असून CBSE दहावीचा शतप्रतिशत निकाल लागला आहे.

मॅकरुन स्टुडन्टस अकादमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षीची 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आणि 90 टक्केपेक्षाही अधिक गुण मिळवून भरघोस यश संपादन केले आहे. असे अतुल्य यश मिळवून  विद्यार्थ्यांनी शाळेच्या  व आपल्या पालकांच्या सन्मानात मोलाची भर घातली आहे. यशवंत विद्यार्थ्यांची नावे जानवी असुटकर 97.6 टक्के, मयुरी काकडे 95.4 टक्के, अंशुल पुनिया 94.6 टक्के, नेहा निमसटकर  94.6 टक्के गुण प्राप्त केले आहे.

मॅकरुन स्टुडंन्टस अकादमीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आणि या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक पी.एस.आंबटकर, प्राचार्या शोभना तसेच शाळेतील  शिक्षकांना  देतात.