Home सामाजिक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रभातफेरी, जमात ए इस्लामी हिंद चा पुढाकार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रभातफेरी, जमात ए इस्लामी हिंद चा पुढाकार

152

वणी बातमीदार:– काही दिवसांपूर्वी ढगफुटी मुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला होता. जीवितहानी मोठया प्रमाणात झाली तर वित्तहानी मुळे कोकण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमात ए इस्लामी हिंद सरसावली आहे. मंगळवार दि. 3 ऑगस्ट ला प्रभातफेरी काढून मदतनिधी व साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली आहे.

कोकणात दोन आठवड्यापूर्वी प्रचंड पाऊस झाला त्यामुळे कोकणातील नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली, अन्न, कपडे, रोख रकमा पुरात वाहून गेल्या, अनेकांचे बळी गेले. नैसर्गिक आपत्ती ने वाताहत झालेल्या कोकणातील पीडित परिवाराला मदत व्हावी याकरिता जमात ए इस्लामी हिंद चे डॉ. आतिक सय्यद, डॉक्टर अर्शद शहा,  बाबा भाई, यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी जमात-ए-इस्लामी हिंद चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या प्रभात फेरीत सहभागी झाले होते.