Home क्राईम मध्यरात्री घरातील मौल्यवान वस्तू लंपास

मध्यरात्री घरातील मौल्यवान वस्तू लंपास

158

50 हजाराची चोरी, मानकी येथील घटना

वणी बातमीदार: वणी तालुक्यातील मानकी येथे अज्ञात चोरट्यानी सताड उघड्या असणाऱ्या घरातील कपाटातून मध्यरात्री मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना गुरुवार दि. 5 ऑगस्ट ला उजागर झाली. चोरट्यानी 50 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संजय शालीक पुंड (37) यांची प्रकृती बरी नसल्याने ते घटनेच्या दिवशी वणी शहरात उपचारासाठी गेले होते. तर अन्य कुटुंबीय निवांत झोपले होते. घरातील प्रमुख दरवाजाला पल्ले नसल्याने सताड उघडया घरात चोरट्यानी सहज प्रवेश करत स्वयंपाक घरातील कपाटातून रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तू लंपास केल्या.

घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच पुंड यांनी वणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत 36 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 13 हजार 500 रोख रक्कम अशी एकूण 50 हजाराची चोरी झाल्याचे नमूद केले आहे. यावरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 380 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.