*वंचित बहुजन आघाडीची मागणी
*तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
वणी बातमीदार: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला. यात शेतकरी, शेतमजुरांचे प्रचंड नुकसान झाले. राज्यातील त्या सर्व पुरपीडितांना शासनाने तात्काळ 5 लाख रुपयांची मदत करावी अश्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने गुरुवार दि. 5 ऑगस्ट ला तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पाठवले आहे.
मागील महिन्यात राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. यात शेतपिके खरडून गेलीत, पुराच्या पाण्याखाली शेती आली तर मोठया प्रमाणात जीवितहानी झाली. असमानी संकटाने भयावह स्थिती निर्माण झाली होती. त्या सर्व पीडितांना आर्थिक सहाय्य होणे गरजेचे आहे. तत्पूर्वी कोरोना महामारीने हैदोस घातला होता यात पूर्णतः अर्थव्यवस्था डगमगली आहे. शेतकरी, शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
राज्य शासनाने खुल्या दिलाने मदत करून पूरग्रस्त पीडितांची कोणतेही निकष न लावता सरसकट तातडीने प्रति कुटुंब 5 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा सल्लागार ऍड. विप्लव तेलतुंबडे, तालुकाउपाध्यक्ष नरेंद्र लोणारे, शंकर रामटेके, अजय खोब्रागडे, सूरज दुर्गे, राजकुमार किनाके, रवी कांबळे यांची उपस्थिती होती.