Home Breaking News शेतातील विद्युत तारेला स्पर्श, तरुणीचा मृत्यू

शेतातील विद्युत तारेला स्पर्श, तरुणीचा मृत्यू

628

बोर्डा येथील घटना

वणी बातमीदार: वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण करण्याकरिता शेताच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात आला होता. त्या जिवंत तारेला 18 वर्षीय तरुणीचा स्पर्श झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना 7 ऑगस्ट ला पहाटे 5.30 च्या सुमारास घडली.

कुमारी रमई परस्ते (18) असे मृत तरुणीचे नाव असून ती मध्यप्रदेशातील खमरिया या गावाची रहिवासी आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी इतर राज्यातून मजूर बोलावतात. दोन महिन्या पूर्वी मजुरीच्या कामा करिता कुमारी ही आपल्या परिवारासह बोर्डा येथे आली होती.

शेतकरी मोठ्या कष्टाने शेतात उत्पादन घेतात मात्र वन्य प्राणी शेतात शिरून पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. त्यामुळे शेत पिकाचे संरक्षण व्हावे या करिता काही शेतकरी शेताच्या कुंपणाला विद्युत करंट लावतात. बोर्डा येथील शेतकरी नितीन ढेंगळे या शेतकऱ्याने वन्य प्राण्यापासून संरक्षण मिळावे या करिता शेताच्या कुंपणाला रात्री च्या वेळी विद्युत करंट लावला होता. पहाटे 5.30 वाजताचे  सुमारास कुमारी ही प्रातः विधी करिता ढेंगळे यांच्या शेता कडे गेली होती. वीज प्रवाहित असलेल्या कुंपणाच्या तारेला स्पर्श होताच तिला जबर झटका बसला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही बाब सकाळी उघड होताच शेत मालक नितीन ढेंगळे यांनी वणी पोलिसांना माहिती दिली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.