Home वणी परिसर तळीराम शिक्षक देतो अध्यापनाचे धडे

तळीराम शिक्षक देतो अध्यापनाचे धडे

1554
Img 20240930 Wa0028

बोटोणीतील शाळा व्यवस्थापन समितीची तक्रार

मारेगाव(बोटोणी): राहुल आत्राम : येथील जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चक्क तळीरामच्या भूमिकेत अध्यापन करतो आहे. याबाबत थेट विद्यार्थ्यांनी, पालकांना तक्रार करताच शाळा समितीने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. बेताल बनलेल्या शिक्षकाच्या भूमिकेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बोटोणी येथील जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक नेहमीच झिंगलेल्या अवस्थेत राहत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. परिणामी , आज सोमवारी चक्क हा शिक्षक तळीरामच्या भूमिकेत असत्तांना विद्यार्थ्यांनी पालकांकडे तक्रार नोंदवली. ही गंभीर कृत्याची पंचायत समिती सदस्य, सरपंच व उपसरपंच यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली शिक्षकाचा झिंगलेला प्रकार निदर्शनास आला.  बालमनावर विपरीत परिणाम होत असल्याने शिष्यांनी गुरूच्या बेतालपणाचे पितळ उघडे पाडले. त्यामुळे ‘गुरू’ समाजमन घडवणारा ‘शिष्य’ कसा घडवेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या गंभीर प्रकारामुळे या बहुचर्चित शिक्षकाची उचलबांगडी करावी  अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे. सदर शिक्षकांवर काय कारवाई होते याकडे पदाधिकारीसह पालकांचे लक्ष लागले आहे.