Home क्राईम गोविंद ऍग्रो एजन्सीत ‘चोरी’, 52 हजार लंपास

गोविंद ऍग्रो एजन्सीत ‘चोरी’, 52 हजार लंपास

296
Img 20240930 Wa0028

*कृषी केंद्राच्या शटरचे लॉक तोडले

वणी बातमीदार: चोरट्यानी आता कृषिकेंद्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. जटाशंकर चौकातील गोविंद ऍग्रो एजन्सी नामक कृषी केंद्राच्या शटर चे कुलूप तोडून चोरट्यानी गल्ल्यात ठेवलेले 52 हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवार दि.10 ऑगस्ट ला सकाळी उघडकीस आली.

गोविंद ऍग्रो एजन्सी चे संचालक राजेश गोविंदलाल केजरीवाल(48) हे जटाशंकर चौक परिसरातच वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी सोमवारी रात्री आपले कृषिकेंद्र बंद केले व घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप शिताफीने कापले आणि दुकानात प्रवेश केला. चोरट्यानी थेट गल्ल्याच्या दिशेने धाव घेत त्यातील 52 हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली व पोबारा केला.

राजेश केजरीवाल हे दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात गेले असता त्यांना कुलुप तुटलेल्या स्थितीत दिसले. दुकानात चोरी झाल्याचा संशय येताच लगेचच दुकानात प्रवेश करून गल्ला बघितला तर त्यातील रोकड चोरट्यानी लांबविल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादवि कलम 380, 461 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.