Home वणी परिसर झरी जामणी आय.टी.आय. मध्ये भरती मेळावा

झरी जामणी आय.टी.आय. मध्ये भरती मेळावा

472

बोटोणी: राहुल आत्राम- झरी जामणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार दि. 14 ऑगस्ट ला आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे मेळाव्याचे उद्घाटक असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक संचालक नरेंद्र येते, तहसीलदार गिरीश जोशी, भालचंद्र चोपणे, महेशकुमार सीडाम, ओमप्रकाश चचडा, गजानन गहूकर, प्रमोद भंडारे, सुजय रहाटे यांची प्रमुख अतिथी म्हणून  उपस्थिती राहणार आहे. भरती मेळावा हा आयटीआय उत्तीर्ण विध्यार्थ्यांकरीता असून मेळाव्याचा कालावधी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे.

मेळाव्याकरिता सुझुकी मोटर्स हंसलपुर, गुजरात व बारामती येथील पियाजीयो व्हेईकल्स प्रा.ली. या नामांकित कंपन्याचे संचालक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंचेविस वर्षा आतील इलेक्ट्रेशन, फिटर, मोटार मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, वायरमन, मशिनिष्ठ, टर्नल या व्यवसायातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य संजय तेलतुमडे यांनी केले आहे..